अब्जाधीश संपत्तीचा मालक आहे सोनू सूद,एका चित्रपटासाठी घेतो तब्बल इतके कोटी

मुंबई : अभिनेता सोनू सूद करोना काळात अनेकांसाठी देवदूतच ठरला. अनेक स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचविण्यास मदत केली असून पैशाच्या स्वरुपात देखील मदत केली. लॉकडाऊन दरम्यान अनेक गोरगरिबांना मदत केली. अनेकांना मदत केल्यामुळे चर्चेत आलेला सोनू सूद सध्या कर चुकवल्याचा आरोपवरून चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने कर चुकवला असल्याचा आरोप करत आयकर विभागाने त्यांची चौकशी केली होती. कर चोरी केल्याच्या आरोपामुळे सोनू सूदबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या संपत्तीबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयकर विभागाच्या नजरेवर  असलेला अभिनेता सोनू सूद सध्या १३० कोटी रुपयांच्या संपत्ती मालक आहे. सोनूने वयाच्या ४८ व्या वर्षी इतकी संपत्ती कमावली आहे. एका इंग्रजी वृत्त पत्रातील  माहितीनुसार सप्टेंबर २०२१ मध्ये सोनू सूदची संपत्ती १३९ कोटी इतकी आहे.

  सोनू सूद हिंदी, साऊथ, तेलगु, तमिळ, हॉलीवूडच्या प्रत्येक चित्रपटासाठी २ कोटी रुपये मानधन घेतो. त्याचे स्वतः चे प्रॉडक्शन हाऊसही आहे.  सोनू सूदने आतापर्यंत ७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं असून, विविध ब्रॅण्डच्या जाहिराती आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो महिन्याला १ कोटी रुपये कमावतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.