Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेल्या निलेश लंकेंनी अखेर काल (दि. ३०) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केलं. पारनेर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांनी राजीनाम्याचे पत्र दाखवलं.
तसेच शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी निलेश लंके अतिशय भावुक झाले होते. । Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil
निलेश लंके यांनी यावेळी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते अशी आपल्या तालुक्यातील परिस्थिती आहे. रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला होता. तर तुम्ही कोण? अशी टीका त्यांनी सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे.
आमच्याकडे तुमच्या प्रमाणे यंत्रणा नसेल पण जीवाला जीव देणारा मावळा आहे असेही ते म्हणाले. या संदर्भात सुजय विखे पाटील यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी निलेश लंके यांनी अजून उमेदवारी अर्ज भरलेला नाही, मग बोलूया असे म्हणत प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे.
राजीनाम्याबाबत बोलताना अश्रू अनावर – Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil
आमदारकीचा राजीनामा देण्यावर लंके म्हणाले की, “लोकसभेची निवडणूक लढविताना विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकलं असतं. विरोधकांकडे वकिलांची फौज आहे. त्यामुळं पुढं जाऊन काही अडचण होऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला.’ असं ते यावेळी म्हणाले. । Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil