Baramati Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा करणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना पाहायला मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतक्या दिवसांपासून बारामती लोकसभा लढवणार म्हणणारे शिवतारे यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली बाजू स्पष्ट करत माघार घेण्याचे कारण सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली होती. शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या हट्टामुळे महायुतीमध्ये वातावरण चांगलंच तापलं होत. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवतारेंना शांत करण्यात यश आल्याचे तूर्तास तरी पाहायला मिळते. | Baramati Loksabha 2024
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊनही शिवतारे लोकसभा लढण्यावर ठाम होते. मात्र नेत्यांना न ऐकणारे शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या फोनवरून नरमले. याबद्दलचा किस्सा त्यांनी स्वतः आज पत्रकार परिषदेत सांगितला.
शिवतारे म्हणाले,”२६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांचे खतगावकर नावाच्या ओएसडींचा मला फोन आला. माझ्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले आणि माझी समजूत काढली अशी माहिती शिवतारेंनी दिली. | Baramati Loksabha 2024
प्रत्येक मतदारसंघात असे अपक्ष उमेदवार उभे राहिले तर महायुतीची अडचण होईल. ज्यामुळे महायुतीचे खासदार पडू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या फोनमुळे मी माझा विचार बदलला असल्याचे देखील शिवतारेंनी यावेळी स्पष्ट केले. शिवतारेंच्या बदललेल्या निर्णयामुळे आता पवार कुटुंबातच बारामतीची लढाई होणार कि यामध्ये आणखी ट्विस्ट पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. | Baramati Loksabha 2024
सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीमधून पहिला उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणूकीसाठी प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ओबीसी बहुजन पार्टीने 9 उमेदवार जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रकाश शेंडेगे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून महेश भागवत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पहिला उमेदवार ठरला आहे.