परभणी : गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील कृष्णा हरिश्चंद्र गुट्टे (वय 20) याची सीमा सुरक्षा दलात (BSF) कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बीएसएफमध्ये भरती झाल्याने त्याच्यावर संपूर्ण गावकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हरिश्चंद्र गुट्टे हे अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे त्यांनी इतरांच्या शेतातही काम करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कृष्णाचे शिक्षण पूर्ण केले. मुलाला केंद्र सरकारमध्ये सुरक्षा दलात नोकरी लागल्यामुळे आता त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. कृष्णाला लहानपणापासून ‘बीडू’ म्हणत असत.
बीडू आता बीएसएफमध्ये रुजू झाल्याने सर्व गावकरी त्याचे अभिनंदन करत आहेत. खादगाव येथील 20हुन अधिक तरुण भारतीय सैन्यदलात विविध विभागात देशसेवेत कार्यरत आहेत.