रत्नागिरी – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आणि इतर काही जणांविरोधात आयपीसी कलम 420अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर ठाकरे गटाचे अनेक नेते आहेत. सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात गंभीर आरोप केले. दापोली येथील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती.
#Dapoli Resorts Farud. FIR registered against #AnilParab & others under IPC 420
दापोली रिसॉर्ट्स घोटाळा. अनिल परब आणि इतरांविरुद्ध आयपीसी 420 अंतर्गत एफआयआर गुन्हा दाखल @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/dIBjoOXYFy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 8, 2022
त्यानंतर आता दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपल दिघे यांनी या संपूर्णप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये अनिल परब आणि इतर दोघांविरोधातसुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.