Sanjay Jadhav on Mahadev Jankar। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या २६ एप्रिल रोजी या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे याठिकाणचे मतदार ठरवणार आहेत. दरम्यान, मविआचे उमेदवार संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार तसेच रासप नेते महादेव जाकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. 26 एप्रिलनंतर महादेव जानकर हे रेल्वेस्थानकावर झोपतील. तर आमदार रत्नाकर गुट्टे हे तुरुंगात असतील, असा दावा जाधव यांनी केला आहे.
मराठा अन् ओबीसी धुव्रीकरण केलं जातंय
परभणीतील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक डॉक्टर यांच्याशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना संजय जाधव यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, “2024 सालची लोकसभा निवडणुकी वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. भाजपने बारामती आणि माढाची जागा वाचविण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमध्ये पाठवले आहे. जानकर यांना परभणीतून उमेदवारी देताना त्यांना एका विशिष्ट जातीचे लेबल लावून पाठवले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण करून लढत आहे,” असा आरोप जाधव यांनी केला.
जानकर रेल्वे स्टेशनवर झोपणार Sanjay Jadhav on Mahadev Jankar।
पुढे त्यांनी,”देशाच्या संविधानिक पदावर असलेले मोदी म्हणतात मी ओबीसी, फडणवीस म्हणतात आमचा डीएनए ओबीसी आहे. यांनीअसं म्हणल्यावर सर्वसामान्य इतर लोकांनी कुणाकडे बघायचे. अरे माझा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मोदींची सभा परभणीत झाली,” असेही संजय जाधव म्हणाले. तसंच 26 एप्रिल नंत एक जण रेल्वेस्टेशन तर एक जण तुरंगातमध्ये झोपणार असा टोलाही संजय जाधव यांनी महादेव जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांना लगावला.
परभणीचे मोदी आम्हीच Sanjay Jadhav on Mahadev Jankar।
दरम्यान, काही जण मोदी-मोदी करतात. पण त्यांना सांगेल की परभणीचा मोदी आम्हीच आहोत. उद्या तुमच्यावर काही वेळ आली तर आम्हीच तुमच्यासाठी धावून येणार आहोत. मोदी मदत करायला येणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, असं ही जाधव परभणीतील जनतेला उद्देशून म्हणाले.