बारामती : आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने मिशन बारामती अंतर्गत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार असल्याचे भाजपचे लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे.त्याची पुर्वतयारी आतापासुनच सुुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मुक्कामी दौºयावर येणार आहेत. ११ तारखेला खडकवासला,भोर,पुरंधर,जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत.यावेळी पटेल यांच्यासमवेत आमदार राम शिंदे,गणेश भेगडे,वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत.
पटेल हे येथील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे सत्ताधारी पदाधिकाºयांच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीच्या प्रमुखांना भेटणार आहेत. यामध्ये पटेल सहकारतज्ञ चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील निवासस्थानी मुक्कामी येणार आहेत.
सत्तारांच्या शिवीगाळावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “ही महाराष्ट्राची..”
याचवेळी ते राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,माळेगांवचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची भेट घेवुन चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी इंदापुर,भिगवण,दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.