PM Modi in Maharashtra । लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. त्यानंतर आता सर्व पक्ष दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार करताना दिसून येतायत. त्यातच दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश आहे. त्यातील परभणी, नांदेडच्या उमेदवारांसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल होत आहेत.
आज परभणी, नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. नांदेड येथे सकाळी 10 तर परभणीत 12 वाजता पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत.
नांदेड, परभणीत पंतप्रधानांची जाहीर सभा PM Modi in Maharashtra ।
पंतप्रधान मोदींच्या सभेच्या नियोजनासंदर्भात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली यावेळी माहिती देताना त्यांनी 20 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा नांदेडमध्ये येथे सकाळी 10 वाजता नांदेड येथील सभा घेऊन 12 वाजता परभणीमध्ये पोहोचतील आणि 12 वाजता परभणीतील सभा घेतली जाणार आहे. परभणीच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून परभणीची जागा निश्चितपणे महादेव जानकर हे दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकतील, असा विश्वासही भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी 10.30 वाजता पंतप्रधानांचं आगमन PM Modi in Maharashtra ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून हजारो पोलिसांचा फौजफाटा नांदेडमध्ये तैनात करण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज मोदींची सभा पार पडणार आहे. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदींचं नांदेड येथे आगमन होणार आहे.
परभणीत महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भव्य दिव्य व्यासपीठ, तीन हेलिपॅड, मोठी आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी पूर्ण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे.