Devendra Fadnavis | Mahadev Jankar | Lok Sabha Election 2024 : देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार असून, सगळीकडे निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपने देखील ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार..’ असा नारा दिला आहे.
दरम्यान, अश्यातच आज राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं. । Devendra Fadnavis | Mahadev Jankar | Lok Sabha Election 2024
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांचं कौतुक केलं.
पंतप्रधान मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. “जानकरांना सांगा की, अठराव्या लोकसभेसाठी मी त्यांची वाट पाहत आहे..’ असं फडणवीस यावेळी म्हणाले. । Devendra Fadnavis | Mahadev Jankar | Lok Sabha Election 2024
पंतप्रधान मोदींचा संदेश घेऊन फडणवीस परभणीत, नेमकं काय म्हणाले…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली.
तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार आहोत अशी माहिती आम्ही मोदींना दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी आहे.
मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला.
जानकरांनी माझ्यासोबत पाच वर्षे काम केलं…
ते म्हणाले की, “जानकरांनी माझ्यासोबत पाच वर्षे मंत्रिमंडळात काम केलं. त्यावेळी त्यांनी काही तक्रार केली नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटानं करायचे. पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर एक रुपयाचा डाग लागला नाही.
हा माणूस मंत्रिमंडळात आला त्यावेळी फाटका होता, जन्मभर फाटकाच राहणार. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये महादेव जानकरांचं स्थान आहे. महादेवराव जानकर यांची श्रीमंती ही इथे बसलेले लोकं आहेत.
महादेव जानकरांची श्रीमंती ही महाराष्ट्रातील दिन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्या मनामध्ये जी जागा आहे, ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे. असं फडणवीस यावेळी म्हणाले. । Devendra Fadnavis | Mahadev Jankar | Lok Sabha Election 2024