बारामती (प्रतिनिधी ): कऱ्हावागज ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजारापासून गावातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, या हेतूने वारंवार हात धुण्यासाठी आज दि (9) रोजी संपूर्ण गावात 1 हजार डेटॉल साबनांचे वाटप केले . कऱ्हावागजच्या सरपंच मंगल सदाशिव नाळे उपसरपंच आप्पासाहेब सांगळे ग्रामपंचायत सदस्यांनी हा उपक्रम राबवला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे ,संतोष गावडे,अमोल जमदाडे,आबा गावडे, सचिन नाळे सूयकांत लष्कर ,वसंत मोरे ,इरफान तांबोळी ग्रामसेवक गवळी , ग्रामपंचयात कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी घरीच राहा वारंवार हात स्वच्छ करा , आणि घराबाहेर महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका आणि सर्वांनी तोंडाला मास्क चा वापर करा असा संदेश यावेळी देण्यात आला .