नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकवेळा देशाला संबोधित करण्यासाठी रात्री 8 वाजता लाईव्ह येत असतात. मात्र, आज पंतप्रधान मोदी यांनी 6 वाजताची वेळ निवडून जनतेला संबोधित केले. तसेच अगदी थोड्या वेळात त्यांनी आपले भाषण आटोपले.
पंतप्रधान आज कोणत्या विषयावर बोलणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पंतप्रधान मोदींनी आज कोरोनाच्या नियमांचे पालन करा, स्वत:सह इतरांची काळजी घ्या असा सल्ला दिला. तसेच कोरोनाच्या लसिबाबत युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले.
मोदींच्या भाषणाला नकारात्मक येणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या युट्यूबवरून डिसलाईकचे बटन हटविण्यात आले. त्याचे कारण म्हणजे, पाच मिनीटामध्येच 4400 डिसलाईक आणि 2600 लाईक होते. तर, 2124 जण लाईव्ह पाहत होते. डिसलाईक वाढण्याचा धोका नको म्हणून भाजपने ते बटनच चालू केले नाही.
देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला आहे, कोरोना घटतोय. डाॅक्टर, नर्सेस यांनी खूप छान काम केले आहे. तसेच जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.