विजयवाडा – आंध्र प्रदेशातील शाळा 2 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जाहीर केले की कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा पुन्हा सुरू केल्या जातील.
राज्याच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक दिनदर्शिकेची रचना 148 शैक्षणिक दिवसांसह केली असून सरकारने विद्यार्थ्यांसाठी पर्यायी दिवसांवर वर्ग घेण्याचे ठरविले होते. 1, 3,5, 7, 9 तुकड्यांचे वर्ग एका दिवशी वर्ग असतील तर दुसऱ्या दिवशी 2, 4, 6, 8 चे वर्ग असतील. 750 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असणाऱ्य्ा शाळांमध्ये दर आठवड्यात दोन दिवस दोन शिफ्टमध्ये कामकाज चालेल तर 750 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये आठवड्यातून तीन दिवस एका शिफ्टमध्ये कामकाज चालेल. नोव्हेंबर महिन्यात अर्ध्या दिवसासाठी शाळा कार्यरत राहतील आणि शाळांमध्ये दुपारचे भोजन झाल्यावर विद्यार्थ्यांना घरी पाठवले जाईल.
राज्याचा शालेय शिक्षण विभाग वर्ग आयोजित करण्याबाबत आरोग्य विभागासह कृती आराखडा तयार करीत आहे. शाळांमध्ये हातांची स्वच्छता आणि शारीरिक अंतर ठेवणे अनिवार्य केले जाईल. वर्गातील गर्दी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना छोट्या तुकड्यांमध्ये विभागले जाईल.
दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल शिक्षक संघटना व पालकांनी आनंद व्यक्त केला. “शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतलेला आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. पर्यायी दिवसांवरील वर्गांमुळे कोविड19 च्या प्रसाराची शक्यता कमी होण्यास मदत होईल. शाळा व्यवस्थापनाने दररोज वर्ग खोल्या स्वच्छ केल्या पाहिजेत आणि निरोगी वातावरण राखले पाहिजेत, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.