बेल्हे – आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी (दि.९) रोजी १००४१ कांदा पिशवीची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला केवळ १२० रूपये बाजारभाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोंढ्यात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस ११० ते १२०रूपये बाजार भाव मिळाला, तसेच एक नंबर कांद्यास १०० ते ११० बाजारभाव मिळाला. दोन नंबर कांद्यास ९० ते १०० रूपये, तिन नंबर कांद्यास दहा किलोस ६० ते ९० रूपये तर चिंगळी कांद्यास दहा किलोस २० ते ६० रूपये बाजार भाव मिळाला. तसेच बदला कांद्यास दहा किलोस २० ते ५० रूपये बाजारभाव मिळाला आहे. मिडीयम कांद्यास दहा किलोस ६० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान, सध्या आळेफाटा येथील बाजार समितीत नविन कांदा विक्रीसाठी आलेला असुन सध्या मिळणारा बाजारभाव अतीशय कमी असुन या मिळणाऱ्या बाजारभावातुन शेतकऱ्यांचा झालेला खर्च देखील निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.