गॅस सिलेंडर व कांदा दरवाढीने कोलमडले गृहिणींचे बजेट

पिंपरी – करोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सावरत असतानाच गॅस सिलेंडर व कांदा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली असून, कांद्याचा प्रतिकिलोचा दर 50 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारात कांद्याचा वापर करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

करोनामुळे लॉकडाऊनचा बसलेला फटका, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाला वाढीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी कांद्याचे हातचे पिक गमवावे लागले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर 80 रुपये प्रतिकिलोवर पोचले होते.

त्यानंतर हळुहळू कांद्याची आवक वाढू लागल्याने कांदा 20 रुपये किलोवर आला होता. त्याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. तर आवक घटल्याने किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

लाल कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा महाग झाला असून, किरकोळ बाजारात त्याचे दर गगनाला पोहोचले आहेत. आता उन्हाळी कांदा कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे.मात्र, ही आवक अल्प प्रमाणात असल्याने गेल्या आठवडाभरापासून बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरचा दर 723 रुपयांवरुन 773 रुपयांवर पोचला आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. तर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानेदेखील सर्वसामान्यांची चिंता वाढविली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.