नाशिक – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती आज अचानक अस्थिर झाली. येवल्याहून नाशिकला परत येत असताना भुजबळ यांचा थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने वाटेत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.