नवी दिल्ली – करोनावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याने यंदा होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पूर्णच रद्द केली जाण्याचे संकेत मंडळाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिले आहेत.चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे आयपीएलसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मूळ वेळापत्रकानुसार येत्या 29 मार्चपासून सुरू होणार होती. मात्र, ती आता 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी जर करोनाचा धोका कायम राहिला तर ही स्पर्धा जुलै व सप्टेंबरमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यावेळीही अनेक संघांच्या मालिका असल्याने ही स्पर्धा तेव्हा आयोजित करणे शक्य होणार नाही अशा परिस्थित यंदाची आयपीएल स्पर्धा रद्दच करावी लागेल, अशी शक्यताही या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.