मुंबई – राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे. आज झालेल्या बदल्या या महत्त्वाच्या बदल्या मानल्या जात आहेत. त्यानुसार जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. तर, पी शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोणाची कुठे बदली?
1. डॉ.नितीन करीर (1998 बॅच) अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, वरून अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त),मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती.
2. मिलिंद म्हैसकर (1992 बॅच) यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती.
3. डी.टी.वाघमारे (1994 बॅच) यांची गृहविभागाच्या प्रधान सचिव म्हणून जबाबदारी.
4. राधिका रस्तोगी (1995 बॅच) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती.
5. डॉ. संजीव कुमार(2003 बॅच) मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदावरून महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.
6. श्रावण हार्डीकर(2005 बॅच) यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नियुक्ती.
7. तुकाराम मुंढे (2005 बॅच) यांची कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती.
8. जी. श्रीकांत (2009 बॅच) यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती.
9. डॉ. अभिजित चौधरी(2011 बॅच) यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती.
10. पी. शिव शंकर(2011 बॅच) यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.