मुंबई – राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारमध्ये जसे फेरबदल होत आहेत तशाच अधिकाऱ्यांच्याही बदल्या होत आहेत. त्यानुसार राज्यातल्या 41 आयएएस अधिकाऱ्याच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. त्यासंबंधी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे.
अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याचे सचिव म्हणून तुकाराम मुंडे आता काम बघतील.
यासह, राजेंद्र शंकर क्षीरसागर, वर्षा ठाकूर-घुगे, संजय चव्हाण, आयुष प्रसाद, बुवनेश्वरी एस, अजित कुंभार, डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, डॉ. पंकज आशिया, कुमार आशीर्वाद, अभिनव गोयल, सौरभ कटियार, तृप्ती धोडमिसे, शुभम गुप्ता, मीनल करनवाल यांच्यासह राज्यातील आणखी अधिकाऱ्यांदी बदली करण्यात आली आहे.