दिवसभरात मोबाईलवर एकही फोन आला नाही तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? तुम्ही वारंवार स्वत:चा मोबाईल चेक करता का? फोन सापडत नसल्यास तुम्ही वेडेपिसे होता का? फोनशिवाय जगता येणार नाही असं तुम्हाला वाटत का? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर ‘हो’ असं असेल तर तुम्ही ‘नो-मो फोबिया’ या आजाराचे शिकार झाला आहात. ‘नो-मो फोबिया’ म्हणजेच आपल्याकडे मोबाइल नसण्याची भीती चला तर मग जाणून घेऊया या बद्दलची माहिती…
काय आहे नो मोबईल फोबिया?-
‘नो मोबईल फोबिया’ हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. अशा प्रकारचा आजार झालेल्या व्यक्ती मोबाइलशिवाय राहू शकत नाही. त्यांना फ़ोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. तर अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच व्यस्त असतात. हळूहळू ते कुटुंबापासून लांब होऊन आपल्याच विश्वात रमताना दिसतात. एव्हढेच नव्हे तर त्यांना तहान- भूक याचीही शुद्ध राहत नाही. थोडक्यात काय तर त्यांच्या वैयक्तिक विकासाचा मार्ग खुंटतो व घसरणीला लागतो.
तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली आहे तस तशी नवनवीन आव्हानेही पुढे येऊ लागली आणि नव्या प्रकारचे टेक्नो फोबिया अस्तीत्वात आले आहे. यातीलच एक फोबिया म्हणजे ‘नो-मो फोबिया’ आहे.
१९८३ मध्ये पहिला मोबाईल फोन बाजारात आला आणि आज सर्वांच्या जीवनात महत्वाचे स्थान मिळवून बसला आहे. आजची तरुणाई ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यालाच चिकटलेली असते. ते पाहता त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले असे म्हणण्यास काही हरकत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात याच व्यसनाचा उल्लेख नो मो फोबिया असा करण्यात आला आहे.