गुजरात – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हाय होल्टेज असा सामना होणार आहे. अहमदाबादचं मैदान फलंदाजीसाठी अतिशय पोषक मानलं जातं. स्टेडियम मोठं असल्यामुळं फलंदाजांना चौकार आणि षटकार मारताना मोठी ताकद लावावी लागेल. याशिवाय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्याच्या गुजरातने आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकत प्लेऑफच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. तर डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सने आठपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज कोणाचे पारडं जड ठरतयं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अशी आहे टीम…
गुजरात टायटन्स संघ –
हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि शुभमन गिल
दिल्ली कॅपिटल्स –
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, सरफराज खान, ललित यादव आणि यश धुल