नागपुर करोना स्थितीसाठी आयुक्त मुंडेंची नवीन स्ट्रॅटेजी

नागपुर – नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहरातील करोना स्थितीच्या नियंत्रणासाठी नवीन धोरण निश्‍चीत केले आहे. त्यात करोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्याचा तसेच अन्य मध्यम ते तीव्र लक्षणे दिसणाऱ्यांना कोविड हॉस्पीटल मध्ये दाखल करण्याचा नियम निश्‍चीत करण्यात आला आहे.

गजबजलेल्या भागातील नागरीकांना क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल करण्याचीहीं सुचना त्यांनी केली आहे. तसेच महापालिका हद्दीत करोनाच्या अँटीजेन टेस्ट वाढवण्यात येणार असून बेडच्या व्यवस्थापनाचीहीं वेगळी व्यवस्था केली जात आहे.

करोना पॉझिटीव्ह रूग्णांकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यांच्या वर्गवारी नुसार त्यांची उपचारासाठी विविध िंठकाणी भरती केली जाणार आहे.

आज पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नागपुरात सरकारी रूग्णालयांमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करण्याची मोठी क्षमता आहे. येत्या काहीं दिवसांत आणखी पाच हॉस्पीटल्स केवळ करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तयार केली जात आहेत. या काळात खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची लूट केली जाऊ नये यासाठीही लक्ष ठेवणारी वेगळी यंत्रणा महापालिका पातळीवर कार्यरत केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.