आॅकलंड : यंदाच्या वर्षातील पहिल्याच विदेशी दौ-यात भारताने न्यूझीलंडविरुध्द शुक्रवारी टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. या पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर विराटसेना आज प्रजासत्ताकदिनी दुसरा सामना जिंकत विजयी झेंडा फडकविण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे न्यूझीलंडही विजयी घोडदौड रोखण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत आणि न्यूझीलंडमधील दुस-या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात ऑकलंड येथील इडन पार्क मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
New Zealand have won the toss and they will bat first in the 2nd T20I.#NZvIND pic.twitter.com/bd8Xnn6fgU
— BCCI (@BCCI) January 26, 2020
दरम्यान, इडन पार्कमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा टी-२० सामना होत असून आतापर्यंतचे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघात हा तेरावा टी-२० सामना होत असून आतापर्यंत चार वेळा भारताने तर आठ वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.