#ICCWorldCup2019 : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

रॉस टेलरचा धडाकेबाज खेळ

लंडन – अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने केलेल्या झुंजार खेळामुळे न्यूझीलंडला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविता आला. त्यांनी बांगलादेशवर दोन गडी व सतरा चेंडू बाकी राखून मात केली. पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेला हरविले होते.

न्यूझीलंडने बांगलादेशला 49.2 षट्‌कांत 244 धावांवर रोखले. त्यानंतर न्यूझीलंडने 47.1 षटकांत व आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. त्यामध्ये टेलर याने केलेल्या 82 धावांचा मोठा वाटा होता. त्याने कर्णधार केन विल्यमसन (40) याच्या साथीत केलेली शतकी भागीदारीही महत्त्वपूर्ण ठरली.

गुप्टील (25) व कॉलीन मुन्‍रो (24) ही सलामीची जोडी 55 धावांमध्ये तंबूत परतल्यामुळे न्यूझीलंडचा डाव अडचणीत सापड्‌ला होता. तथापि, कर्णधार केन विल्यमसन व टेलर यांनी आत्मविश्‍वासाने खेळ करीत संघाचा डाव सावरला. त्यांनी 21.1 षटकांत 125 धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. विल्यमसन याला केवळ एकच चौकार मारता आला. टेलर याने 91 चेडूंमध्ये नऊ चौकारांसह 82 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर त्यांच्याकडून मोठी भागीदारी झाली नाही. मात्र शेवटच्या फळीत जेम्स नीशम (25), कॉलीन डी ग्रॅंडहोमी (15) व मिचेल सॅंटर (नाबाद 17) यांनी दमदार खेळ करीत संघाचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक :

बांगलादेश – 49.2 षटकांत सर्वबाद 244 (शकीब अल हसन 64, मोहम्मद सैफुद्दीन 29, मॅट हेन्‍री 4/47, ट्रेन्ट बोल्ट्‌ 2/44)

न्यूझीलंड – 47.1 षटकांत 8 बाद 248 (रॉस टेलर 82, केन विल्यमसन 40, मेहंदी हसन 2/47, शकीब हसन 2/47)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)