New rules for national awards : केंद्र सरकार तर्फे दिले जाणारे इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक आणि नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारांमधील दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावे वगळण्यात आली आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने 70व्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नियमावलीमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव बदलण्यात आली आहेत. | New rules for national awards
आता इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराचे नाव पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे असणार आहे. तर नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आता राष्ट्रीय, सामाजिक, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बदल करण्यात आला आहे. | New rules for national awards
या बदलांसह दादासाहेब फाळके पुरस्कारासह इतरही पुरस्कारांच्या रोख रकमेत वाढ करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराचे रोख पारितोषिक 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आले आहे. सुवर्ण कमळ पुरस्काराची रक्कम तीन लाखांनी वाढवण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्काराचे नाव सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत करण्यात आले आहे. विशेष ज्युरी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या चित्रपट आणि बिगर चित्रपट श्रेणीमध्ये दोन विशेष उल्लेखनीय चित्रपट पुरस्कार देण्याचा अधिकार ज्युरींना देण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्रात मोदी सरकार आल्यापासून नेहरु-गांधी घराण्यातील नावाने चालवल्या जाणाऱ्या योजना, पुरस्कारांना विरोध राहिलेला आहे. दिल्लीतील अनेक संस्थांच्या नावात असलेले नेहरु-गांधी घराण्यातील लोकांची नावे याआधीही मोदी सरकारकडून बदण्यात आली आहेत.
दिल्लीतील नेहरु स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय करण्यात आले आहे. | New rules for national awards
लसणाचे भाव वाढले.. 1 कोटी कमावले ! लोकांनी चोरी सुरु केली पठ्ठयाने शेतात CCTV लावले
“मोदी पुन्हा विजयी झाल्यास प्रादेशिक पक्ष संपतील” ‘या’ बड्या नेत्यानं वर्तवल भाकीत