Muthoot Finance Q3 Results | मुथूट फायनान्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीला 1,027.3 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीला 901.7 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
Muthoot Finance Q3 Results
FY24 च्या डिसेंबर तिमाहीत मुथूट फायनान्सचे निव्वळ व्याज उत्पन्न 1905.7 कोटी रुपये झाले. मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1704.3 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम 11.8 टक्के अधिक आहे.
व्यवस्थापनाखालील एकत्रित कर्ज मालमत्ता गेल्या वर्षीच्या 65,085 कोटी रुपयांच्या तुलनेत FY24M मध्ये वार्षिक 27% वाढून 82,773 कोटी रुपये झाली. या तिमाहीत व्यवस्थापनाखालील एकत्रित कर्ज मालमत्ता तिमाही आधारावर 4 टक्क्यांनी वाढून 3280 कोटी रुपये झाली आहे.
मुथूट ग्रुपचे अध्यक्ष जॉर्ज जेकब मुथूट म्हणाले, “व्यवस्थापनाखालील एकत्रित कर्ज मालमत्तेमध्ये वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे, सहाय्यक कंपन्यांचे योगदान गेल्या वर्षीच्या 12 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामध्ये सहायक कंपन्यांचे योगदान करानंतर एकत्रित नफा देखील गेल्या वर्षीच्या 4% वरून 9% पर्यंत वाढला. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले आहेत. आज, 14 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.14 टक्क्यांनी वाढ होऊन तो 1,383 रुपयांवर बंद झाला.