“मोदी पुन्हा विजयी झाल्यास प्रादेशिक पक्ष संपतील” ‘या’ बड्या नेत्यानं वर्तवल भाकीत

PM Modi Loksabha 2024 – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून व विशेषत: कॉंग्रेसकडून सातत्याने टीका केली जाते. सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अग्रस्थानी असतात. त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे एका बाबतीत त्यांनी चक्क सरकारची प्रशंसाही केली आहे.
काही नेते सरकारच्या धोरणांवर टीका करतात. तथापि, खासगीत मात्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचेही म्हणत असतात. चिदंबरम यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारवर टीका करतानाच त्यांनी सरकारची जी गोष्ट त्यांना पटली त्याची प्रशंसाही खासगीत न करता जाहीरपणे केली. मोदी यांनी तिसऱ्यांदा तेच सत्तेत येण्याचे संकेत दिले आहे. काही जनमत चाचण्यांद्वारेही हेच निष्कर्ष काढण्यात आले आहेत. | PM Modi Loksabha 2024
त्या पाश्र्वभूमीवर जर मोदीच पुन्हा सत्तेत आले तर २०२४ नंतरचा काळ हा विरोधी पक्षांसाठी अडचणीचा असेल असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सरकारची पाठ थोपटताना मात्र ते म्हणाले की या सरकारचे एक वैशिष्ट्य आहे. कोणतीही गोष्ट लागू करायची असेल तर ती अत्यंत योग्य पध्दतीने लागू करतात. त्यांची अंमलबजावणीची प्रक्रिया अगदी उत्तम आहे व हे मी मान्य करतो. ते मान्य करण्यास मला कोणतीही नाराजी असण्याचे काही कारण नाही. | PM Modi Loksabha 2024
दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले की सरकारने अगोदर २०२३-२४ पर्यंतची मुदत यासाठी मागितली होती. आता ते आणखी दोन वर्ष मागत आहेत. याचा अर्थ आता त्यांनी गोल पोस्टच फिरवला आहे. अर्थात पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली तर आम्हाला सगळ्याना आनंदच होईल.
चिदंबरम पुढे म्हणाले की २०२४ ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकली तर ते प्रादेशिक पक्षांसाठी अडचणीचे ठरेल. विरोधी पक्षच राहीले नाहीत तर विरोधकांचे अस्तित्वच संपुष्टात येईल. देशात पीएमएलए कायद्याचा दुरूपयोग केला जातो आहे. कॉंग्रेसचे सरकार आले तर आम्ही हा कायदा रद्द करू आणि त्याला पर्यायी कायदा आणला जाईल. सध्या या कायद्याचा वापर राजकीय शस्त्रासारखा केला जातो आहे. | PM Modi Loksabha 2024





