अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या “चेहरे’ला नवी रिलीज डेट मिळाली आहे. हा सिनेमा यापूर्वी शूजित सरकारच्या “गुलाबो सिताबो’ला टक्कर देणार होता. अर्थात यामध्येही अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये आहेच. “चेहरे’ 24 एप्रिलला रिलीज करायचे नियोजन आगोदर ठरले होते.
मात्र “गुलाबो सिताबो’बरोबर स्पर्धा नको, म्हणून आता हा सिनेमा 17 जुलैला रिलीज होणार आहे. “गुलाबो सिताबो’च्या निर्मात्यांकडून विनंती झाल्यावर हा बदल करण्यात आला आहे. इमरान आणि अमिताभ बच्चन हे दोघेही आपल्या कूल मूडमध्ये बसलेले एक पोस्टर रिलीज झाले आहे.
“चेहरे’हा एक मिस्टरी थ्रिलर असणार आहे. त्याचे शूटिंग गेल्या वर्षीच 20 डिसेंबरला संपले आहे. त्यामध्ये क्रिती खरबंदा लीड रोलमध्ये असणार आहे. तर बच्चन हे एका वकिलाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. तर इमरान हाश्मी उद्योजक असणार आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. “गुलाबो सिताबो’ किंवा “चेहरे’ दोन्हीपैकी कोणताही सिनेमा आगोदर रिलीज झाला असता, तरी फायदा बच्चन यांचाच होणार होता.