भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारलेला “83’मध्ये रणवीर सिंह कपिल देव यांचा रोल करतो आहे.
त्या विश्वविजयी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे रोल जे कलाकार करत आहेत, त्यांची ओळख करून देण्याचे काम रणवीर सिंह सध्या नियमितपणे करतो आहे.
त्या वर्ल्डकप विनर टीममध्ये मऱ्हाठमोळा आदिनाथ कोठारे देखील दिसणार आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या रोलमध्ये आदिनाथ कोठारे बॅटिंग करताना दिसणार आहे.
“कर्नल’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या वेंगसरकर यांची क्रेझ संपूर्ण मराठी क्रिकेटप्रेमींना होती.कव्हर ड्राईव्ह मारतानाचा आदिनाथ कोठारेचे एक मस्त पोस्टर रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
“83’च्या टीममधील अकराव्या आणि अखेरच्या खेळाडूची ओळख रणवीरने करून दिली आहे. कूपर ऍन्ड लिब्रॅन्ड रेटिंगनी वेंगसरकर यांना त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवले होते.
2 मार्च 1989 पर्यंत तब्बल 21 महिने वेंगसरकर या क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर होते. इन्स्टाग्रामवरच्या पोस्टर शृंखलेमध्ये रणवीरने स्वतः (कपिल देव)पासून सुरुवात केली. त्यानंतर हार्डी संधू, निशांत दहिया, दिनकर शर्मा, चिराग पाटील, राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना आणि साहिल खट्टर या अन्य कलाकारांनाही टीममधील अन्य खेळाडूंच्या रोलमध्ये असल्याची ओळख करून दिली होती.