मुंबई – करोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये आता पर्यंत अनेक भाजप नेत्यांनी कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे अजब गजब दावे केले आहे.
तर यातच जागतिक पर्यावरण दिन ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी असाच अजब दावा केला आहे. करोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हंटले होते.
View this post on Instagram
नुकताच देशभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याच दरम्यान हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की,’करोनाचा नायनाट करण्यासाठी हवन उपयुक्तच मी रोज करते, तुम्हीही करा” असा सल्ला त्यांनी सोशलवर वीडियो शेअर ठरत दिला होता.
भाजपा नेता और अभी अभी वैज्ञानिक बनी हेमा मालिनी कोरोना के बारे में बता रही हैं कि हवन से हारेगा कोरोना।वह कह रही है- “जब तक महामारी को हरा न दें, हर दूसरे दिन करें हवन, इससे पर्यावरण भी शुद्ध होगा”
— Dr.Meraj Hussain (@drmerajhusain) June 5, 2021
दरम्यान आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे हेमा मालिनी यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
एका यूजरने ‘दाक्षिणात्य अभिनेत्री हुशार असतात पण या त्यांच्यामधील नाहीत’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘चुकीची माहिती पसरवू नका’ असे म्हणत हेमा मालिनी यांना ट्रोल केले आहे.