नवीदिल्ली – चित्रपटासह राजकीय घडामोडींवर देखील मोकळेपणाने भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रणावत नेहमीच चर्चेत असते. कधी ती इंडस्ट्रीतील वादाबाबत भाष्य करते तर कधी एखाद्या राज्यातील मुख्यमंत्र्यावरच थेट आरोप करते. अशात कंगना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आता यावर खासदार हेमा मालिनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
हेमा मालिनी या तब्बल २ वेळा उत्तर प्रदेशातील मथुरेमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांना कंगनाच्या निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता त्यांनी मिश्किल टिपण्णी केली. कंगना मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटत असा सवाल हेमा मालिनी यांना विचारला असता त्या म्हणाल्या, “खूप चांगली गोष्टी आहे,उद्या राखी सावंत देखील खासदार होऊ शकते” असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.
#WATCH | Mathura, Uttar Pradesh: When asked about speculation that actor Kangana Ranaut could contest elections from Mathura, BJP MP Hema Malini says, “Good, it is good…You want only film stars in Mathura. Tomorrow, even Rakhi Sawant will become.” pic.twitter.com/wgQsDzbn5Z
— ANI (@ANI) September 24, 2022
हेमा मालिनी यांचा याबाबतचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यापूर्वी कंगना तिच्या कुटुंबासह वृंदावन येथील मंदिरात दर्शनासाठी आली होती. तेथे तिने पूजा केली. मीडियाशी बोलताना यावेळी कंगना म्हणाली, मी येथे भगवान कृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे, कारण मी माझ्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.तसेच यावेळी कंगनाने कोणत्याही राजकीय प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला होता.