मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘गहराइयां’ या सिनेमामुळं चांगलीच चर्चेत आहे. सिनेमात दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांचे इंटिमेट सिन्स दाखविण्यात आले आहे. या सिन्सने सर्वांचेच लक्ष वेधले असून, ‘गहराइयां’ सिनेमा येत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीचा रोमान्स पहायला मिळतोय. “तेरी बाहों मे ऐसे खो गये… जेसै खुदसे ही रिहा हो गये…” असे या गाण्याचे बोल आहेत.
View this post on Instagram
यात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या कथा आहे.
View this post on Instagram
Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.