मुंबई – डान्सर- अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि फोटोंमुळे सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. सोशलवर दररोज वेगवेगळ्या अवतारामध्ये दिसते. नुकतंच तिनं एक फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये ती जंगलाच्या राजासोबत दिसून येत आहे.
View this post on Instagram
नोरा सध्या दुबईतील व्हेकेशन एन्जॉय करत आहे. आपल्या दुबईतील व्हेकेशनचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नोराने तिथे पांढऱ्या सिंहासोबत फोटो शूटही केलं आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडियो तिने स्वत: शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना नोराने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘आता सिंहासारखी एनर्जी पाहायला मिळेल… तसे हे खूपच सुंदर आहेत.
View this post on Instagram
तिचे हे फोटो इंस्टाग्राम व सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. नोराच्या या फोटोंवर अनेक यूजर्सने विविध कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोरा फतेहीला ‘नाच मेरी राणी’ , ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ या स्पेशल सॉंगमुळे प्रसिद्धी मिळाली. तसेच तिने ‘स्ट्रीट डान्सर-3डी’, ‘बाटला हाउस’, ‘भूज’ आणि ‘स्त्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्णायक भूमिका साकारल्या आहेत.