बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड ही सतत लोकांच्या मदतीला धावून जात असते. नेहाने नुकतीच आर्थिक संकटात सापडलेल्या प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना पाच लाखांची मदत केली होती. यानंतर आता तिने पुन्हा एकदा चमोली येथील एका मजुराच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.
View this post on Instagram
“इंडियन आयडल सीजन 12’मधील प्रतिस्पर्धी पवनदीपने उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना पिडीत मजूरांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर नेहा कक्कडने पवनदीपचे कौतुक केले. नेहा कक्कड म्हणाली, आपण एक शानदार गायक आहात. हे आम्ही सर्वजण जाणतो. त्याच बरोबर आपण एक चांगले व्यक्तीदेखील आहात.
View this post on Instagram
उत्तराखंडमधील बेपत्ता मजुरांच्या कुटुंबियांसाठी आपण पुढे आला आहात आणि त्यांच्या मदतीसाठी सर्वांना मदतीची विनंती केली आहे. या मिशनमध्ये मी पण तुमची साथ देणार आहे. मी उत्तराखंडमधील बेपत्ता मजुरांच्या कुटूंबियांसाठी तीन लाख रुपयांची मदत देवू इच्छिते. तसेच मी सर्वांना मदतीसाठी पुढे येण्याची विनंती करते, असे नेहा कक्कडने सांगितले.