मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती सतत आपले फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. यामुळे ती नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. आताही तिने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन हंगामा केला आहे.
जान्हवी कपूर आपल्या पिंक रंगाची पॅन्ट आणि ग्रे रंगाचा बॅकलेस टॉपमध्ये खूपच सुंदर दिसते. सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फोटोवर हजारो कमेन्ट केल्या जातात.
जान्हवी कपूर लवकरच आगामी “रुही’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत असतील. जान्हवी कपूर नेटफ्लिक्सवर रीलिज झालेल्या “गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल’मध्ये दिसली होती.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. जान्हवी कपूरने धडक या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज तिचे नाव सर्वत्र चर्चेत आहेत.