बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. विशेष म्हणजे प्रेगन्सीच्या काळातही नेहा काम करत आहे. रॉनी स्क्रूवाला यांच्या आगामी “ए थर्सडे’मध्ये तिचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटात ती प्रेगन्ट कॉपची भूमिका साकारत आहे. नेहाने आपल्या फर्स्ट लुक शेअर करत लिहिले की, रियल आणि रिल लाइफमध्ये मी एक मध्यसुवर्ण साधत आहे. आपण सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्याने आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याने मी आपल्या सर्वांची आभारी आहे. तसेच जगातील मातांसाठीही हे काम निश्चितच मोलाचे ठरेल.
आपण सर्व संघटितपणे मजबूत बनूया. या लुकमध्ये ती खूपच “रफ ऍण्ड टफ’ दिसून येत आहे. बेहजाद खंबाटा द्वारा दिग्दर्शित आणि लिखित “ए थर्सडे’ हा चित्रपट गुरुवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात नेहा धुपिया ही एसीपी कॅथरीन अल्वारेझ नामक एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
या थ्रिलर चित्रपटात यामी गौतम, डिंपल कपाडिया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांसारखे स्टार कास्टने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा एका बुद्धिमान प्ले स्कूल शिक्षकाच्या अवती-भवती रंगविण्यात आली आहे. ज्याने 16 मुलांना ओलीस ठेवलेले असते.