सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत “जवानी जानेमन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अलाया एफने पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर उमटविली आहे. ती सध्या कार्तिक आर्यनसोबत “फ्रेडी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
तसेच बालाजी टेलीफिल्म्सद्वारा निर्मित “यू टर्न’मध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. आता अनुराग बसू द्वारा दिग्दर्शित एका चित्रपटात ती झळकणार आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट असल्याने ती शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे.
“यू टर्न’चे सुमारे 45 दिवसांचे शूटिंग नुकतेच पूर्ण करून ती मुंबईला परतली आहे. यानंतर तिने तातडीने “फ्रेडी’चे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय ती अनुराग बसूच्या आगामी चित्रपटातही काम करत आहे. मात्र, याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. या चित्रपटातील भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तिच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.