मुंबई – टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत भारताला सुवर्णपदक प्राप्त करून देणारा भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शानदार कामगिरी करून नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्यामुळे भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
सध्या सगळीकडेच नीरजच्या खेळाचं लोक जोरदार कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेकांना त्याच्या डॅशिंग लूक आणि परफेक्स्ट बॉडीचं वेड लागलं आहे. नीरजचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ आता शोधून काढले जात आहे. नुकतंच असाच एक नीरज चोप्राचा जुना व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओ मध्ये नीरज रांगडा डान्स करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या नृत्य कौशल्याचंही कौतुक केलं आहे. मैदानात खेळाबाबत सतर्क आणि गंभीर असणारा नीरज वैयक्तिक आयुष्यात मात्र एकदम बिनधास्त आणि मस्त जीवन जगणारा माणूस असल्याचं या व्हिडिओ मधून दिसून येत आहे.
Neeraj Chopra can shake a leg too besides throwing Javelin to #Olympics #Gold limits 👏😹#NeerajChopra #goldmedal #NeerajGoldChopra pic.twitter.com/7ii3oqAUiQ
— Rosy (@rose_k01) August 7, 2021
हा व्हिडिओ त्याच्या एका मित्राच्या लग्नाच्या वरातीचा असून, तो आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचताना दिसत आहे. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दिलेर मेहंदी यांच्या ‘सतरंगी’ आणि आणखी एका हरियाणी गाण्यावर नीरज तुफान डान्स करत आहे.
नीरज चोप्रा वयाच्या तेराव्या वर्षापासून क्रीडाक्षेत्राकडे आकर्षित झालेला आहे आणि त्याला त्यासाठी कुटुंबियांनी कायम पाठबळ दिलेले आहे. त्याचा जन्म 24 डिसेंबर 2997 रोजी हरयानातील पानिपत जिल्ह्यातील खांडरा येथे झाला. त्याचे वडील सतीशकुमार शेती करतात तर आई सरोजदेवी गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी आहेत.