नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र करोना प्रत्येकवेळी नवीन रुप धारण करत आहे. त्यामुळे आरोग्यविभागाची चिंता वाढली आहे. याआधी देशात करोनाचे अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंट आले आहे. आता करोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे.
करोना व्हायरचा एटा व्हेरिएंट समोर आला आहे. कर्नाटकमध्ये हा व्हेरिएंट मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळुरुमध्ये हा प्रकार समोर आला असून करोनाच्या तिसऱ्या लाटेशी या व्हेरिएंटचे काही कनेक्शन आहे याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरु केला आहे. हा व्हायरस जास्त वेळपर्यत जीवंत राहू शकतो तसेच जास्त लोकांनामध्ये हा व्हायरस पसरवू शकतो. असे जानकारांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराचे आजवर एकूण 66 रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण पहायला मिळाले आहेत. विशेष म्हणजे 18 जणांना लस घेतल्यानंतरही लागण झाली आहे. असे असताना हे नवीन संकट समोर आले आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.