मुंबई – ‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून मराठी अभिनेत्री ‘श्वेता शिंदे’ घराघरात पोहोचलेली आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब श्वेता शिंदे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
काही वर्षांपूर्वी श्वेता अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. तिने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से, आगामी प्रोजेक्ट यासह स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्वेता शिंदेनं आपल्या बोल्ड अँड स्टनिंग अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
View this post on Instagram
I heard beauty is how you feel on the inside and it reflects in your eyes.. is it?
नुकतंच श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
श्वेता मूळची साताऱ्याची असून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती मुंबईत आली. मुंबईमध्ये महाविदयालयात असतानाच तिला अनेक मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे ती आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.
सध्या श्वेता ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत झळकत असून तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.
View this post on Instagram
If it feels crazy to fall for someone else, why don’t we try to fall for ourself!❤️