नीरा -बारामती करोनाचे रुग्ण आढळल्याने व करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून नीरा गाव शुक्रवार (दि. 10) ते रविवार (दि. 12) असे तीन दिवस पूर्ण बंद राहणार आहे. फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
या तीन दिवसांत किराणा दुकाने, भाजी मंडई, फळ विक्री, शेतीपूरक खते, बी-बियाणे, मटण, चिकन, अंडी विक्रेत्यांची आदी दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.