मुंबई – भाजपने आपल्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्ररचनेतुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बढती देत निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाष्य केले असून यामुळे गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचे म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, नितीन गडकरी यांचा भाजपाच्या संसदीय मंडळात समावेश न होणं एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचं दर्शवत आहे.जेव्हा तुमचं कौशल्य व क्षमता वाढतात, आणि तुम्ही नेतृत्वासमोर आव्हान उभं करता तेव्हा भाजपा तुमचं महत्व कमी करतं,” तसेच कलंकित झालेल्यांना पदोन्नती दिली जाते असा टोलाही यावेळी क्रास्टो यांनी लगावला आहे.
Nitin Gadkari ji not included in BJP’s Parliamentary Board shows that his stature as an astute politician has grown leaps and bounds.
When your calibre and capabilities grow and you pose a challenge to the higher ups the #BJP downsizes you.
The tainted get upgraded…— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) August 17, 2022
नितीन गडकरींना वगळल्याने वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रकारच्या चर्च्यांना उधाण आले होते. अनुभवी आणि मुरब्बर व्यक्तिमत्वाला भाजपने नेमकं वगळायचं कारण काय याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अशात दिल्ली दरबारी मात्र देवेंद्र फडणवीस यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसल्याच पाहायला मिळत आहे.