मुंबई – राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या या विभागणीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे आता नेमकं किती लोकप्रतिनिधीच संख्याबळ आहे यावरून दोन्हही गटाची राजकीय ताकद स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिले जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान शरद पवार गटासमोर आहे.
अजित पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील ४१ आमदार
नागालँडमधील ७ आमदार
झारखंड १ आमदार
लोकसभा खासदार २
महाराष्ट्र विधानपरिषद ५
राज्यसभा १
शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा -३
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत