मुंबई – अमेरिकेसह अनेक देशांशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मादक द्रव्य जप्त केले आहे.
मुंबईतील तीन कारवायांमध्ये एकूण 1.403 किलो एमडीएमए (2917 गोळ्या), 1.840 किलो हायड्रोपोनिक वीड आणि 0.26 ग्रॅम एलएसडी (24 ब्लॉट्स) जप्त करण्यात आल्याचे एनसीबीने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने अमेरिका, युनायटेड किंगडम आणि नेदरलॅंड या देशांतून मुंबईत ड्रग्जची तस्करी द्वारे आयात केली आहे.
एनसीबीच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुंबई कस्टम विभागाच्या मदतीने, एनसीबीचे पथक संशयित पार्सल शोधून काढतात, आणि त्याचा कसोशिने माग काढून पुढील कार्यवाही करीत असतात. सध्या ड्रग मनीमधून विकसित झालेल्या व्यवहारांचा आणि इतर मालमत्तेचा शोध घेण्यासाठी अधिक सखोल तपास केला जात आहे.