अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग या चित्रपटासह ट्रेलर थिएटरमध्ये दाखवला जाईल, या चित्रपटाशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. ट्रेलर लॉन्चची तारीख जवळ असतानाच आता अभिनेत्री नयनताराचा एक फोटो व्हायरल होत आहे. जवानमधला तिचा हा फर्स्ट लूक असल्याचं बोललं जात आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Leaked, NAYANTHARA’s first look from #Jawan #Nayanthara #JawanTrailer pic.twitter.com/4OkQbu1Ljo
— Nayanthara Fan Account (@NayanthaaraF) July 6, 2023
नयनताराच्या फॅन अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती बॉलरूममध्ये बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा प्लेसूट घातलेला दिसत आहे. हा फोटो खरा आहे की फोटोशॉप केलेला असला तरी अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
जवान हा नयनताराचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. बातमीनुसार, नयनतारा या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे. शाहरुखशिवाय जवानमध्ये नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार असल्याचेही वृत्त होते. नयनतारा या चित्रपटात शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारत असून शूटिंगसाठी ती चेन्नईमध्येही दिसली होती.
चित्रपटाचा ट्रेलर पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे, परंतु काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, त्यापूर्वी चित्रपटाचा टीझर येऊ शकतो. रिपोर्टनुसार, जवानचा टीझर 7 जुलै किंवा 15 जुलै रोजी लॉन्च केला जाऊ शकतो आणि तो आतापर्यंतचा सर्वात मोठा डिजिटल लॉन्च असेल.