मुंबई – अभिनेत्री मधु ‘रोजा’, ‘योद्धा’, ‘झालीम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. 90 च्या दशकात त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारून इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. पण मधूने करिअरच्या शिखरावर असताना ते अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच मधूने एका इव्हेंटमध्ये खुलासा केला आहे की,’तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय का घेतला होता. मधुने सांगितले की, तिला ऑफर करण्यात आलेल्या पात्रांवर ती खूश नव्हती.’
हिंदी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मधुने तामिळ, कन्नड आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती मुंबईत शिफ्ट झाली आणि हिंदी इंडस्ट्रीत काम करू लागली. रिपोर्टनुसार, मधु म्हणाली,’मी अशा चित्रपटांचा एक भाग आहे ज्यात अॅक्शन हिरो मुख्य भूमिकेत होते. तुम्हाला ९० च्या दशकाबद्दल माहिती असेलच.’
मधु पुढे म्हणाली,’मला यात काही अडचण नव्हती. मी अनेक चित्रपटांमध्ये नृत्य केले आहे. मला डान्स करायला आवडते पण रोजा मध्ये काम केल्यानंतर मला पुन्हा डान्स करायला अजिबात आनंद झाला नाही. माझ्या शूटिंगच्या तारखा जवळ आल्या की मी नाराज व्हायचे. तेव्हाच मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी इंडस्ट्री सोडत असल्याचे पत्र सर्वांना लिहिले. हे पत्र लिहिण्यामागचा माझा हेतू असा होता की तुम्ही लोक मला डिसर्व करत नाही.’ असं म्हणत तिने संताप व्यक्त केला होता.