चिंबळी, (वार्ताहर) – मरकळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नयना भानुदास लोखंडे-वर्पे तर उपसरपंचपदी वैशाली मच्छिंद्र लोखंडे यांची निवड झाली असल्याचे मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले.
मरकळ ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने सरपंच अमोल लोखंडे, उपसरपंच नयना वर्पे यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली.
यात सरपंचपदासाठी हनुमंत लोखंडे व नयना भानुदास लोखंडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले तर उपसरपंचपदासाठी संगीता बाळासाहेब लोखंडे यांचे अर्ज आल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी नयना लोखंडे यांना 8 तर हनुमंत लोखंडे यांना 6 तर उपसरपंचपदासाठी वैशाली लोखंडे यांना 8 मते पडली. सरपंच म्हणून नयना लोखंडे तर उपसरपंच म्हणून वैशाली मच्छिंद्र लोंखडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी घोषित केले.
यावेळी 15 पैकी 14 सदस्य उपस्थित होते यामध्ये माळवत्या उपसरपंच नयना वर्पे, रामदास लोखंडे, हनुमंत लोखंडे, नयना लोखंडे (वर्पे), शीतल लोखंडे, संगिता लोखंडे, सतीश लोखंडे, संतोष कुंभार, उज्ज्वला लोखंडे, संतोष भुसे, स्वाती चव्हाण, वैशाली लोखंडे, भानुदास लोखंडे, आशा लोखंडे, तलाठी बाळासाहेब जाधव,
ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. माघाडे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच दशरथ लोखंडे, बाजीराव लोखंडे, सोमनाथ लोखंडे, प्रशांत लोखंडे यांनी यावेळी विषेश प्रंयत्न केले यावेळी सर्व सदस्यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.