चिंबळी,(वार्ताहर) – गोलेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला वाल्मिक शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी सेवक थोरात यांनी सांगितले.
गोलेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने सरपंच अमित चौधरी यांनी राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सेवक थोरात यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी निर्मला वाल्मिकी शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते सरपंच अमित चौधरी, उपसरपंच बेबी नामदेव चौधरी, मयूर शिंदे, दीपक चौधरी, अतुल चौधरी, अश्विनी चौधरी, निलम चौधरी, निर्मला चौधरी, पल्लवी चौधरी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक मोहिनी कडू पाटील व ग्रामस्थ होते.