अलीकडच्या काळात मालदीवला सुट्टी एन्जॉय करायला जाणाऱ्या अनेक स्टार्सच्या बातम्या पुढे आल्या आहेत. मालदीव वरून आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या या स्टार्सवर नवाजुद्दीन सिद्दीकी भडकला आहे. सर्व जग करोनाच्या संकटांमध्ये असताना या कलाकार मंडळींना टुरिझम कसे काय सुचवू शकते?
मालदी म्हणजे एक तमाशा बनवून टाकले आहे, असे नवाजुद्दीनने आपल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. लोकांना घराबाहेरही पडणे शक्य नसताना मालदीवचे फोटो पोस्ट करून काय साध्य करायचे आहे.
आपले हिंडणे-फिरणे आपल्या पुरतेच मर्यादित ठेवावे. जरा तरी इतरांचा विचार करावा. इतरांच्या दुःखावर डागण्या देऊ नये, असे खरमरीत मत नवाजुद्दीनने या व्हिडिओमध्ये व्यक्त केले आहे. आपण स्वतः बुधना येथील आपल्या घरी कुटुंबाबरोबररहात आहोत. हेच आपले