माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरवर युनिसेफने जागतिक लसीकरण सप्ताहाच्या जनजागृतीची जबाबदारी सोपवली आहे. भारतातील बालकांच्या लसीकरणाची जुनजागृती करण्याचे काम तिच्याकडे आहे. कोविड-19 लसीकरणादरम्यान लहान मुलांना दुर्लक्षिले जाऊ नये असे मानुषीने यानिमित्ताने म्हटले आहे. लसीकरणामुळे बालकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते आणि धोकादायक पोलिओ आणि गोवर यासारख्या रोगांपासून त्यांचे रक्षण होते.
बालकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपण त्यांचे लसीकरण नियमितपणे केले पाहिजे. विशेष कोविड-19 च्या लसीकरणापासून बालकांना दूर ठेवता कामा नये, असे मानुषीने म्हटले आहे. सौंदर्य स्पर्धेतील यशानंतरचे सामाजिक काम केल्यावर आता मानुषीने आपल्या बॉलिवूडमधील करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. “पृथ्वीराज’ या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटातून ती अक्षय कुमार बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विकी कौशल बरोबरच्या आणखी एका सिनेमातही तिची निवड झाली आहे. मात्र अद्याप या सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही.