Navneet Rana Amravati Lok Sabha| अमरावती लोकभा मतदार संघाची उमेदवारी विद्यमान खासदार नवनीत राणांना देण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. यासाठी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल देखील केला जात आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल येत्या १ एप्रिलला हा निकाल लागेल. त्यांच्या बाजूनं निकाल लागल्यास २ एप्रिलला राणा यांना भाजपकडून उमेदवारी घोषित केली जाईल. निकाल विरोधात गेल्यास भाजपनं प्लान बी तयार केला आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी महत्त्वाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने १०८ पानाचा जजमेंट दिला आहे. त्यामध्ये राणा यांचे सात ही जात प्रमाणपत्र खोटे ठरविले आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातू असून त्याचा निकाल १ एप्रिलला लागणार आहे.
निकाल लागल्यानंतर २ एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर ४ एप्रिलला नवनीत राणा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपकडून या उमेदरवारांची नावं चर्चेत Navneet Rana Amravati Lok Sabha|
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास राणा यांना निवडणूक लढवता येणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपनं पर्याय तयार ठेवले आहेत. प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत.
दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई यांच्यासह एका माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही विचाराधीन आहे. त्यामुळे भाजपकडे अमरावतीसाठी तीन पर्याय तयार आहेत. राणा यांच्या विरोधात निकाल गेल्यास या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
राणा यांच्यावरील आरोप कोणता ? Navneet Rana Amravati Lok Sabha|
जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा:
नाशिकच्या ‘जागेवरून वाद’ पेटणार…! भाजप अन् शिंदे गटानंतर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?